राहू (दौंड) – मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. तसेच राज्यातील विविध भागात आमरण उपोषणे, साखळी उपोषण सुरु असून मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (दि.31) टाकळी भिमा (ता. दौंड) येथे दिवसभर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणास सर्वात करण्यात आली. लाक्षणिक उपोषणामध्ये सरपंच राहुल वडघुले, माजी सरपंच निखिल ठाकर, अशोक नरसाळे, अशोक वडघुले, दिलीप ठाकर, रवींद्र गोडसे, संतोष गरदरे, अनिल मेमाणे, प्रदीप मांढरे, मच्छिंद्र नरसाळे, सुनिल मेमाणे, दीपक वडघुले ऋतिक कुंजीर, रवींद्र नरसाळे, नितीमन चव्हाण, योगेश वडघुले, संदीप पांगरकर, अजिंक्य मांढरे, वैभव वडघुले, रोहिदास ठाकर यांनी उपोषणात भाग घेतला.
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी गावातील सर्व अबालवृद्ध व महिला मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. घोषणा देत संपूर्ण गावाला पूर्ण फेरी मारून ग्रामदैवत हनुमान मंदीरात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून कँडल मार्चची सांगत करण्यात आली. यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
दौंड : टाकळी भीमा येथे मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ लाक्षणिक उपोषण pic.twitter.com/49b9VZ6vkb
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 31, 2023