नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने (AAP) आता हरियाणातही दंड थोपटले आहेत. राज्यातील लोकसभेच्या (loksabha election) आणि विधानसभेच्या सर्व जागांसाठी आप पक्षाने प्रभारींच्या नावांची घोषणा केली.
हरियाणात (Hariyana) लोकसभेच्या 10 आणि विधानसभेच्या 90 जागा आहेत. या जागांसाठी प्रभारी म्हणून प्रामुख्याने पंजाबमधील (Punjab) नेत्यांची आपने वर्णी लावली आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर साधारण चार महिन्यांनी हरियाणात विधानसभा निवडणूक (Widhansabha Election) होईल. त्या दोन्ही निवडणुकांसाठी आप आतापासूनच सज्ज होत आहे.
आप पक्षाने लवकरच विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या मध्यप्रदेश आणि छत्तिसगढमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे, तिन्ही राज्यांत भाजप आणि कॉंग्रेस हे एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. त्या राज्यांत स्वत:चे राजकीय बस्तान बसवण्यासाठी आप सरसावला आहे.
आप आणि कॉंग्रेस (Congress) हे इंडिया (india) या विरोधी पक्षांच्या आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात लढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर, विरोधी पक्षांनी बनवलेली आघाडी केवळ आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आहे. त्यासाठी अद्याप जागावाटपाची चर्चा सुरू झालेली नाही, अशी भूमिका आपकडून मांडली जात आहे.