Reserve Bank of India| रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBIने एका बँकेवर कारवाई केली आहे. RBI नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक बँकांवर कारवाई करते, यातच आता पूर्वांचल को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे. ही बँक उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे आहे. नियमांचं पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे आता ही बँक कोणताही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही.
कारवाई करण्यामागचे कारण काय?
कारवाईबाबत आरबीआयने म्हटले आहे की, या बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही. बँकेला बँकिंग व्यवसाय पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सर्वसामान्यांचे नुकसान होऊ शकते. संभाव्य धोका लक्षात घेता, RBIने पूर्वांचल को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. उत्तर प्रदेशचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना बँक बंद करण्याचे आणि लिक्विडेटरची नियुक्ती करण्याचे आदेश जारी करण्यास सांगितले आहे, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.
या बँकेत ठेवी असणाऱ्या प्रत्येक ठेवीदाराला त्याची ठेव रक्कम 5 लाखांपर्यंत डिपॉझिट इन्शुरन्स आणि लोन गॅरंटी कॉर्पोरेशनकडून मिळण्याचा अधिकार असणार आहे. पूर्वांचल सहकारी बँकेच्या आकडेवारीनुसार, सुमारे 99.51 टक्के ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी DICGC कडून मिळण्याचा अधिकार आहे.
तसेच या बँकेत 5 लाखांपेक्षा कमी रक्कम जमा केलेल्या 912 खातेदारांना आरबीआयने 12 कोटी 63 लाख रुपये परत केले आहेत, तर 1691 खातेदारांना 22 कोटी 92 लाख रुपये परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर बँकेकडून 40 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाला ठोठावला दंड
याशिवाय रिझर्व्ह बँकेने सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 1.45 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं हा दंड ठोठावण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे . हे निर्देश लोन्स अँड अॅडव्हान्सेस आणि कस्टमर प्रोटेक्शनशी संबंधित आहेत.
हेही वाचा :