India Allince Complaint to SEBI । केंद्रात एनडीएची सत्ता आली असली तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. निवडणूक निकालापूर्वी स्टॉक मार्केटबाबत केलेल्या वक्तव्याचा अमित शाह यांना फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे. इंडिया आघाडीचे खासदार आज सेबीकडे तक्रार करणार आहेत. दरम्यान, सेबीकडे तक्रार करायला जाण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या खासदारांनी शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर भेट घेतली. यावेळी तृणमुलचे खासदार साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी आणि सागरीका घोष उपस्थित होते. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अरविंद सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. अमित शहांच्या वक्तव्याच्या चौकशीची मागणी India Allince Complaint to SEBI । लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होण्यापूर्वी 3 जून रोजी शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतरच 4 जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, त्यावेळी मात्र बाजारात कमालीची पडझड पाहायला मिळालेली. काँग्रेसनं नुकताच शेअर बाजारातील या चढ-उताराला सर्वात मोठा घोटाळा ठरवून जेपीसी चौकशीची मागणी केली होती, तर आता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानं पुन्हा एकदा हा प्रश्न चर्चेत आला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी याप्रकरणी बाजार नियामक सेबीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणीही केली जाणार आहे. राहुल गांधींनीही केलेले गंभीर आरोप India Allince Complaint to SEBI । तृममूलचे नेते साकेत गोखले यांच्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केलेले. निवडणूक निकालाच्या दिवशी शेअर बाजाराला आलेल्या त्सुनामीच्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यांनी याप्रकरणी जेपीसीची मागणी केली होती. शेअर बाजारात विक्रमी वाढ झाल्याचं सांगत अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकांना शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिल्याचंही राहुल गांधी म्हणाले होते.