नवी दिल्ली :- भाजपने आज उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना राज्यातील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. 15 सप्टेंबर रोजी होणारी पोटनिवडणूक विद्यमान खासदार हरद्वार दुबे यांच्या निधनामुळे होत आहे.
ते देखील भाजपचेच होते. या जागेची मुदत नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. राज्य विधानसभेत भाजपला असलेल्या भक्कम बहुमतामुळे शर्मा यांची निवड निश्चित आहे.
दुबे यांच्याप्रमाणे तेही ब्राह्मण समाजातील आहेत. शर्मा हे 2017-22 दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या टर्ममधील दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक होते. सध्या ते उपमुख्यमंत्री नाहीत, परंतु त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपने त्यांचे पुनर्वसन केले आहे, असे मानले जात आहे.