पुणे – पुण्यातील पारंपरिक महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर महाराष्ट्रातील पहिला लिस्टेड, तरुण व सर्वाधिक पुरस्कारांनी सन्मानित ब्रँड गार्गी बाय पीएनजीचे ब्रँड स्टोअर सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन पु ना गाडगीळ आणि सन्सचे प्रमोटर अजित गाडगीळ व डॉ. रेणू गाडगीळ यांच्या हस्ते गुरूवारी झाले. आगामी काळात संपूर्ण भारतात गार्गी बाय पीएनजीचा विस्तार करण्याची योजना आहे.
लक्ष्मी रस्त्यावर कॉमन वेल्थ बिल्डिंगजवळ एक हजार चौरस फुटांत जागतिक स्टाइल व दर्जाचे ब्रँड स्टोअर गार्गी बाय पीएनजीचे आहे. उद्घाटनाच्या वेळेस पीएनजी सन्स व गार्गी बाय पीएनजीचे प्रवर्तक डॉ. रेणू व अजित गाडगीळ, पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीचे संचालक आदित्य मोडक यांच्यासह सतीश कुबेर, श्रीकांत कुबेर, शशीकुमार पंकज, समीर परांजपे आदी उपस्थित होते.
कंपनीचे संचालक आदित्य मोडक म्हणाले, “तरुणाईस उच्च गुणवत्तेची ब्रँडेड स्टर्लिंग सिल्व्हर ज्वेलरी व प्रीमियम फॅशन ज्वेलरी आकर्षक किमतीला देणे हा गार्गीचा हेतू आहे. तरुणांसाठी व वर्किंग वुमनसाठी डिझायनर फॅशन ज्वेलरी, डेली वेअर व वॉर्डरोब ज्वेलरी येथे उपलब्ध आहे. नेकपीस, पेंडंट-सेट्, इअररिंग्स, ब्रेसलेट्स, अँकलेट्स, हेअर अॅक्सेसरीज, चेन, कफलिंग्स, नेकलेस आदी ज्वेलरीचे प्रकार त्यात आहेत. अँटिक, क्रोम, स्टर्लिंग, गोल्ड, रोझगोल्ड फिनिशिंग ज्वेलरीच्या असंख्य व्हरायटी ब्रँड शॉपमध्ये उपलब्ध आहेत.”
“सध्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटकमध्ये गार्गी बाय पीएनजीची तीस शॉप इन शॉप असून, तीन ब्रँड फ्रँचायसी आहेत. त्यात सेक्टर १७ वाशी, फर्ग्युसन कॉलेज रोड- पुणे व गुरुवारी सुरू झालेले लक्ष्मी रस्त्यावरील ब्रँड स्टोअर यांचा समावेश आहे. तसेच, मुंईबत अंधेरी, इन ऑर्बिट मॉल – मालाड, विवियाना मॉल – ठाणे, सीझन्स मॉल- हडपसर, औंध वेस्टंड सेंटर वन-पुणे येथील शॉपर्स स्टॉपमध्ये प्रत्येकी एक एसआयएस आहे. या आर्थिक वर्षात आतपर्यंत नऊ ठिकाणी गार्गी बाय पीएनजीचे आउटलेट सुरू झाले आहे.
आगामी काळात देशात विविध ठिकाणी शॉप इन शॉपसह उत्तर व दक्षिण भारताच्या महत्त्वाच्या शहरांत फ्रँचायसी सुरू करण्याची योजना आहे. फ्रँचायसीसाठी शशीकुमार पंकज यांच्याशी shashikumar.pankaj@pngsl.com संपर्क साधावा, ” असे मोडक यांनी नमूद केले