पुणे – देशभरात मंगळवारी 15 ऑगस्टला मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मात्र पुण्यात प्रसिद्ध गायिकेने तिरंग्याचा अपमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. युक्रेनची लोकप्रिय गायिका उमा शांतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तिने तिरंग्याचा अपमान केल्याचे दिसते. याप्रकरणी उमा शांतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील मुंढवा परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये 14 ऑगस्ट रोजी उमा शांती हिचा परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तिने हातात तिरंगा घेतला होता. मात्र अचानक तिने हातातील तिरंगा थेट प्रेक्षकांकडे भिरकवला. तिच्या याच कृतीमुळे अनेकजण संताप व्यक्त करत आहे. याप्रकरणी तिच्यावर आणि कार्यक्रमाच्या आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आता पोलिस अधिक तपास करत आहेत. यावर नेटकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त करत गायिकेला अटक करण्याची मागणी केली आहे.
Pune : Controversy Erupts As Singer Disrespects National Flag During Performance During A Pre-Independence Day Celebrations In A Musical Concert . Pune Police Files Case Against Singer and Organiser. #Singer #NationalFlag #UmaShanti #Pune #ViralVideo https://t.co/hRd1BtXqLC pic.twitter.com/AcPEcLsXSF
— Pune Pulse (@pulse_pune) August 15, 2023
तर, दुसरीकडे पुण्यातील कोंढवा भागात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. कोंढव्यातील लक्ष्मीनगर परिसरात सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. कोंढव्यातील दोघेजण सोमवारी रात्री पाकिस्तान जिंदाबादच्या घाेषणा देत होते. तेथून निघालेल्या काही नागिरकांनी या घोषणा ऐकल्या आणि त्याबाबतची माहिती लगेच पोलिसांना दिली. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. घोषणा देणारे दोघेही लक्ष्मीनगरमधील शाळेच्या बांधकामावर सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे.