मुंबई – प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नेहा सध्या लाखो दिलों की धडक बनली आहे. नेहाने आपल्या दमदार अभिनय आणि ग्लॅमरस लूकमुळे सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर नेहा नेहमीच सक्रिय असते. अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने तिचे काही क्लासी फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. यात तिने लाल आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर तिच्या शॉर्ट हेअरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे फोटो शेअर करत तिने ‘कोण आहे ज्याने मला पुन्हा वळून पाहिले नाही… पण सगळे पाहत आहेत,’ असे गमंतीशीर कॅप्शन दिले आहे. सध्या तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस पडत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, नेहा पेंडसे मराठी बरोबरच हिंदीतील प्रसिद्ध ‘मे आय कम इन मॅडम’ आणि ‘भाभीजी घर पर है’ या मालिकांमध्ये नेहा झळकली होती. यानंतर, ती 2018 मध्ये ‘बिग बॉस शो’ मध्ये दिसली होती. नेहा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. ती नेहमीची आपले हॉट अँड ग्लॅमर्स फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत अनेकांचे लक्ष वेधून घेते.