मुंबई – अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे कपल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेक फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या मिताली आणि सिद्धार्थ स्पेनमध्ये फिरण्यासाठी गेले आहेत. येथील काही फोटो मितालीने इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
स्पेन ट्रिपदरम्यान मितालीने बिकिनी परिधान करत समुद्रकिनारी फोटोशूट केले आहे. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. या लुकमध्ये ती फारच हॉट अंदाजात दिसत आहे. हे फोटो शेअर करत मितालाने नेटकऱ्यांना एक सल्लाही दिला आहे. “आज सकाळी उठून मी कॉन्ट्रोव्हर्सीला निवडलं. कमेंट सेक्शनमध्ये ‘आपली संस्कृती’ याबाबत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला स्वत:ची लाज वाटेल,” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. मितालीच्या हे फोटो सध्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. तर काहींनी यावर टीका देखील केली आहे.
View this post on Instagram
यापूर्वी देखील मितालीने तिचा अंघोळ करतानाचा पाठमोरा फोटो शेअर केला होता. त्यामुळे देखील तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर आता तिने बिकिनीतील फोटो शेअर केल्याने काही जण तिच्यावर टीका करत आहेत. मात्र त्याआधीच तिने ‘ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका’ असे म्हणत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.