जळोची – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला होता. पवार यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख लोकांनी हा निर्णय मागे घ्यावा व निर्णयावर पुनर्विचार करावा अशी मागणी केली होती.
मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम होते पक्षातील सर्वच प्रमुखांसह राज्यभरातील कार्यकर्त्यांनीही निर्णय मागे घेण्यासाठी पवारांकडे आग्रह धरला होता. पवारांनी या मागणीचा आदर करत राष्ट्रीय अध्यक्षपद पुन्हा स्वीकारले आहे. पवारांनी आपला निर्णय मागे घेतल्याने बारामतीत फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला जात आहे.