नवी दिल्ली – भारताचा अष्टपैलू फलंदाज, माजी कर्णधार, यष्टीरक्षक अशी ओळख असलेल्या ‘महेंद्रसिंग धोनी’ने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तेव्हा पासून धोनी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसला नाही. महेंद्र सिंग धोनी एकदिवसीय विश्वकरंडक 2019 च्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची मॅच खेळला होता. मात्र, असं असलं तरी धोनी आयपीएल खेळत राहणार आहे.
31 मार्चपासून आयपीएल 2023 ला सुरुवात झाली असून, यंदाचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळण्यात आला होता. धोनीमुळे चेन्नई सुपरकिंग्ज संघ आयपीएलमधील एक यशस्वी संघ होऊ शकला आहे. आणि त्यामुळेच का होईना प्रत्येक वयोगटात महेंद्रसिंग धोनीचे असंख्य चाहते आहेत. अश्याच एका 88 वर्षांच्या फॅन्सचा एक फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. धोनीचे चाहते त्याच्यावर किती प्रेम करतात हे यातून स्पष्ट दिसून येत आहे.
Heroes are not made, they are born. Dhoni proves that. I am at loss for words for our CSK #Thala @msdhoni at his warmth & hospitality. He met my ma in law, who at 88, hero worships Dhoni & cannot see beyond him. Mahi, you have added many years of good health & happiness to her… pic.twitter.com/darszdzb62
— KhushbuSundar (@khushsundar) April 14, 2023
व्हायरल झालेल्या या फोटोत 88 वर्षांच्या आजीबाई धोनीला अगदी आपल्या मुलाप्रमाणे जवळ घेत गालावर प्रेमाने किस करत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. हा फोटो पाहून अनेकजण भावूक झाले असून, धोनीचं कौतुक करत आहेत. पण यावेळी या आजी कोण आहेत? अशीही चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये असणाऱ्या या आजी भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांच्या सासूबाई आहेत. या भेटीनंतर स्वतः खुशबू सुंदर यांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे.