व्हर्जिनिया – एखादी गोष्ट हरवली आणि नंतर ती सापडली तर निश्चितच सर्वसामान्य नागरिकांना मोठा आनंद होतो एखादी सोन्याच्या अंगठी किंवा एखादा दागिना हरवला आणि तो काही सापडला तर आनंद गगनात मावेना असाच होतो असाच काही अनुभव व्हर्जिनियातील एकाला आला आहे 25 वर्षापूर्वी टेक्निकल कॅम्पस विद्यापीठाच्या परिसरात हरवलेली त्याची अंगठी त्याला परत मिळाली आहे.
कॅम्पसच्या परिसरामध्ये बांधकाम सुरू असताना बांधकाम कर्मचाऱ्यांना जमिनीखाली ही अंगठी आढळली जॉन लेसन्सकी असे या इसमाचे नाव असून 1997 मध्ये तो या विद्यापीठांमध्ये विद्यार्थी असताना ग्राउंडवर खेळत असताना त्याच्या हातातील अंगठी हरवली होती सामना संपल्यानंतर ही अंगठी सापडत नसल्याचे लक्षात आल्यावर जॉन आणि त्याच्या मित्रांनी संपूर्ण ग्राउंड आणि इतर परिसर शोधून काढला त्यांना कोठेही ही अंगठी सापडली नाही त्यानंतर तब्बल 25 वर्षानी याच मैदानावर ड्रेनेज सिस्टीमचे काम सुरू असताना काही बांधकाम कर्मचारी खोदकाम करत होते.
तेव्हा एकाला जमिनीखाली एक चकाकणारा पदार्थ दिसला तो त्याने हातात घेतल्यावर ती अंगठी असल्याचे त्याच्या लक्षात आले बांधकाम कर्मचाऱ्याला त्या अंगठीवर जॉनचे नाव कोरलेले आढळले म्हणून सोशल मीडियाच्या आधारे त्याने त्या अंगठीवरील नावाचा शोध घेतला असता जॉन त्यांच्या संपर्कात आला या कर्मचाऱ्यांनी सध्या नॉर्थ कॅरोलितामध्ये राहणाऱ्या जॉनच्या घरी ती अंगठी पाठवून दिली या घटनेबद्दल जॉनने संबंधित बांधकाम कर्मचारी आणि त्याच्या कंपनीचे आभार मानले असून अशा प्रकारचे परिश्रम अनोळखी व्यक्तीसाठी कोणीही घेत नाहीत असे मत व्यक्त केले आहे.