मुंबई – शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. पठाणच्या यशावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आनंद व्यक्त करत आहेत.
दरम्यान, ‘पठाण’च्या यशानंतर चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टने पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील उपस्थित होती. मात्र, त्यावेळी शाहरुख खानने निळ्या रंगाचं घड्याळ घातलं होतं. निळ्या रंगाच्या घड्याळाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. सध्या सगळीकडे किंग खानच्या याच निळ्या रंगाच्या घडाळ्याची चर्चा होताना दिसत आहे.
या घड्याळाची किंमत नेमकी किती आहे अशी सर्व माहिती शाहरुखच्या फॅन्सनी काढली. आणि या छोटयाश्या घड्याळाची किंमत ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. या घड्याळाची किंमत तब्बल 4.98 कोटी किमतीचे आहे. म्हणजे अंदाजे पाच कोटीचे असल्याचं सांगण्यात आहे. तर हे घड्याळ साडे चार कोटींना विकले जाते असं देखील समोर आलं आहे. ‘ऑडेमार्स पिगेट’ कंपनीचे हे घड्याळ असून, त्यांचे हे रॉयल ओक पर्पेच्युअल कॅलेंडर घड्याळ आहे.
तसेच, शाहरुखकडे बीएमडब्ल्यू 6 सीरीज, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, एक ऑडी आणि इतर कार आहेत. दरम्यान, पठाण चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले असून, या सिनेमाला अद्यापही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.