पुणे । Pune Bye Election Breaking – पुण्यातील कसबा पेठ व चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांमधील निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पुढील महिन्यात (फेब्रुवारी) २७ तारखेला या दोन्ही जागांसाठी मतदान होणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे गतवर्षी २२ डिसेंबरला निधन झाले होते. तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे यावर्षी ३ जानेवारीला प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे पोट निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.
Pune Bye Election : कसबा पोटनिवडणुकीत अंधेरी पूर्व पॅटर्न?
याबाबतचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी तर उमेदवारी मागे घेण्याची तारीख १० फेब्रुवारी असणार आहे.
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम । Pune Bye Election Breaking
– निवडणुकीची अधिसूचना जाहीर : ३१ जानेवारी २०२३
– अर्ज दाखल करण्याची मुदत : ७ फेब्रुवारी २०२३
– अर्जांची छाननी : ८ फेब्रुवारी
– अर्ज मागं घेण्याची मुदत : १० फेब्रुवारी
– मतदान : २७ फेब्रुवारी
– निकाल : २ मार्च