पुणे : लोकप्रतिनिधी हा त्याच्या मतदार संघाचा कुटुंब प्रमुख असतो. या भावनेतून त्याने समाजकार्य केले पाहिजे म्हणजे लोक सुद्धा तुम्हाला माझा लोकप्रतिनिधी हा माझा माणूस आहे असे समजतो. तेव्हाच तुम्हाला सामाजिक काम करणे सोपे होते आणि काम चांगले होते. त्यासोबतच माणूस हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी मंडई विद्यापीठ कट्याच्या कार्यक्रम प्रसंगी केले.
अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी कट्टयाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना निलेश लंके यांनी ‘एक कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. करोना काळात सर्व प्रथम मी कोविड सेंटर चालू केले त्याची क्षमता हि १,१०० पेशेन्ट होती जवळपास 30 हजार लोकांची पाच महिने डॉक्टरांन बरोबर अहोरात्र सेवा केली. मी माझ्या घरी सुद्धा पाच महिन्याने गेलो. कोविडमध्ये आलेल्या प्रत्येक पेशेन्टला प्रथम मी भेटायचो आणि त्यांना दिलासा द्यायचो. तिथेच पेशेन्ट २५ % बरा व्हायचा. या आजारामुळे माझा अंत होऊ शकतो हे समजत असताना सुद्धा मी माझ्या लोकांसाठी काम करीत होतो. माझे कोविड सेंटर हे मंदिर होते. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीने नगर जिल्ह्याच्या राजकारणात काहीच फरक पडणार नाही. पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीगत निष्ठेला सद्या पूजले जाते कारण प्रत्येक पक्ष हा सध्या एका व्यक्तीच्या नावाने चालत आहे, असे देखील निलेश लंके यांनी यावेळी सांगितले.
तर निलेश ढमढेरे यांनी सुद्धा आपले विचार कट्ट्यावर मांडले.यावेळी त्यांनी ‘सहकारातून प्रगती होते. पुणे अर्बन को.आँप बँकेची स्थापना हि महात्मा फुले मंडई मध्ये छोट्या व्यवसाय करणाऱ्या लोकासाठी झाली होती. प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला बचतीची सवयी लागावी हा उद्देश होता. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील सर्व क्षेत्रांना सरकारने मदत केली पाहिजे तेंव्हाच महाराष्ट्राची प्रगती होण्यास मदत होईल, असे म्हटले.
त्यासोबतच सरकारने सहकारी बँकांना नाबार्ड कडे काही टक्के% पैसे ठेवण्यास सांगितले आहे, त्यामुळे बँकेची कॅश लिक़्विटी कमी होणार आहे. सहकारी बँकांच्या माध्यमातून मराठी मुलांना कर्जाचे वाटप केल्यामुळे ते व्यवसायिक होत आहेत व ते इतर मुलांना रोजगार देत आहेत, त्यामुळे समाजातील गुन्हेगारी मध्ये घट होण्यास मदत होत आहे. जून महिन्यापासून बँकेचे शताब्दी वर्ष चालू होत आहे. बँक दर वर्षी सभासदांना १५ % लाभाउंश देत असल्याची महत्वपूर्ण माहिती यावेळी दिली.
तसेच डॉ. महेश बोरा साहेब यांनी सांगितले कि FLASH या सौज्ञाचा तरुणांनी वाफर करावा असे म्हटले. F = Friend (मित्र) , L= Like (आवड) A= art (कला) S= spiritual (आध्यत्मिक) H= Helping Nature (मदतीचा स्वभाव) यामुळे मुलांच्या मध्ये ईम्युनीटी वाढवण्यास मदत होते व ते दिवसभर फ्रेश रहातील. सध्या डॉक्टरांवर जे हल्ले होत आहे ते चुकीचे आहेत. बऱ्याच वेळेला पेशन्टला हॉस्पिटलला मुळातच उशिरा आणल जात त्यामुळे त्याचावर उपचार करण्यास डॉक्टरांना बराच कमी वेळ मिळतो. त्याला डॉक्टर जबाबदार नसतात. सर्व नागरिकांनी करोनाचा बुस्टर डोस घेतला पाहिजे. करोनामुळे घाबरू नका, पण काळजी घ्या, हा मंत्र त्यांनी सांगितला.
दरम्यान, कट्ट्याला आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी केला. यावेळी आमदार निलेश लंके, निलेश (आण्णा) ढमढेरे,अध्यक्ष पुणे अर्बन को.आँप बँक लि., पुणे तसेच डॉ. महेश बोरा, बोरा हॉस्पिटल आदी मान्यवर उपस्थित होते.