मुंबई – ‘बेशरम रंग’ या गाण्यानंतर अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमा चांगलाच चर्चेत आला होता. गाण्यातील बोल्ड सीनमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अशात आता ‘पठाण’मधील दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘झुमे जो पठाण’ असं या गाण्याचं नाव असून, या गाण्यावर शाहरुखचे फॅन्स देखील थिरकताना दिसत आहेत.
फॅन्सला हे गाणं चांगलाच पसंत पडत असून, सोशल मीडियावर देखील गाणं तुफान व्हायरल होत आहे. विदेशी लोकेशन त्यातच शाहरुखसह दीपिकाचा डान्स यामुळे अनेकांच्या पसंतीस हे गाणं उतरताना दिसत आहे. फॅन्सला पुन्हा एकदा दीपिकाच्या बोल्ड अवताराची भुरळ पडल्याचे दिसून येते आहे.
Bobby Deol and gareeb Preity Zinta. pic.twitter.com/hlHpS1zrHx
— Gabbbar (@GabbbarSingh) December 22, 2022
हे गाणं प्रदर्शित होताच सोशलवर या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. एकीकडे अनेकजण या गाण्याचं कौतुक करत असतानाच बऱ्याच जणांनी या गाण्याची खिल्ली देखील उडवली आहे. या गाण्यामुळे शाहरुख खानची थेट तुलना बिग बॉस फेम ‘अभिजीत बिचुकले’शी केली आहे. “शाहरुख खान पठाण चित्रपटात अभिजीत बिचुकलेची भूमिका सकारत आहे.’ अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. तर त्याबरोबरच अनेकांनी त्याचे सिक्स पॅक पाहून नकली दिसत आहेत असं म्हणत त्याच्यावर टीका केली आहे.
Shahrukh Khan as bichukale in New song #JhoomeJoPathaan 😅😂🤣 pic.twitter.com/Nq6N5fIKrm
— Aditya (@AmitTan65923895) December 22, 2022
दरम्यान, ‘झुमे जो पठाण’ हे गाणं प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह, सुकृति आणि कुमारने गायल आहे. गाण्याचे शब्द कुमारने लिहिले असून विशाल शेखरने हे गाण कंपोझ केलं आहे. बॉस्को सिजरने कोरिओग्राफ केलेल्या या गाण्यावर चाहत्यांनी रिल्स देखील बनवायला सुरुवात केल्याचे दिसून येते.