मुंबई -बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून दिवाळी पार्टीचा माहोल सुरु झाला आहे.दीपिका रणवीर मात्र या पार्ट्यांपासून लांबच आहेत. असं असलं तरीही दिवाळीचा जल्लोष ते देखील एन्जॉय करत आहेत. दीपिकाने इन्स्टाग्रामवर दिवाळीनिमित्त एक खास फोटो शेअर केला आहे, ज्याला पाहून तिचा पती रणवीर सिंगही खूप खुश झाल्याचे समजते.
दीपिका पदुकोणने गोल्ड लूकमध्ये तिचा ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये दिवाळीची पणती टाकत जणू आपल्या खास शैलीत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकाने फोटो शेअर करताच तो लगेच व्हायरल झाला. काही वेळातच या फोटोवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या.
View this post on Instagram
दीपिकाच्या या फोटोवर पती रणवीर सिंगचेही कमेंट केली आहे. दीपिकाच्या या फोटोवर रणवीरने ‘स्टनर असं लिहीत एकाच शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरच्या या कमेंटवरही चाहत्यांनी आपलं मत मांडायला सुरुवात केली. दोन्हही स्टार्सची केमेस्ट्री पाहून फॅन्स मात्र भलतेच खुश झाल्याचे पाहायला मिळते.