नवी दिल्ली – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत श्रम मंत्रालाय 2047 साठी आपले व्हिजन तयार करत आहे. यामध्ये कामातील लवचिकता हा महत्वाचा भाग असेल. भविष्यात त्यासाठी विविध योजना येण्याची शक्यता आहे. कामाच्या तासांची लवचिकता आणि कुठूनही काम करण्याची (घरुन, ऑफिसमधून अथवा इतर ठिकाणावरुन) लवचिकता भविष्यात गरजेची असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
श्रम मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने आंध्रप्रदेशात तिरूपती येथे दोन दिवसीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत चार संकल्पनांवर आधारित सत्रे आहेत.
नरेंद्र मोदी म्हणाले, flexi work hours ही काळाची गरज आहे. flexible work place सारख्या सुविधांचा वापर महिला कामगारांसाठी संधी म्हणून केला जाऊ शकतो. यंदा 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात नारीशक्तीच्या संपूर्ण सहभागाचे आवाहन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.