आग्रा – फॅशन ब्लॉगर असलेल्या एका युवतीला तिच्या पतीने हात-पाय बांधून एका इमारतीवरून फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना आज घडली. रितिका सिंह असे या फॅशन ब्लॉगरचे नाव असून तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रितिकाचा पती आकाश गौतम आणि अन्य दोघांना अटक केली आहे.
रितिका तिच्या मित्रासोबत आग्य्रातील अपार्टमेंटमध्ये गेल्या दिड वर्षापासून ‘लिव्ह इन’मध्ये रहात होती. याचा तिच्या पतीला राग होता. शुक्रवारी आकाश आपल्या कुटुंबियांसमवेत तेथे पोचला. आकाश आणि रितिकामध्ये भांडण झाले आणि आकाशने रितिकाला नाला मेवाती भागातील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकले, असे पोलिसांनी सांगितले.
पदवी मिळवल्यानंतर रितिकाने सोशल मीडिया आणि ब्लॉगरच्या क्षेत्रातील कोर्स केला होता. सोशल मीडियावर ती फॅशन, पर्यटन आणि लाईफ स्टाईलशी संबंधित ब्लॉग अपलोड करत असायची. या क्षेत्रात निश्चित उत्पन्न नसल्यामुळे तिच्या सासरचे लोक नाराज असायचे. असे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.