मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. याच्यावरून मनसेने सडकून टीका केली आहे. मनसेचे गजानन काळे यांनी ट्विट करीत सध्या चाललेल्या राजकीय परिस्थितीवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी याबाबत ट्विट करीत म्हंटले आहे की , “राज्याची शोभा” होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
"राज्याची शोभा" होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे.
जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे.
त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली,ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे.— Gajanan Kale (@MeGajananKale) June 10, 2022
राज्याची शोभा होईल अशी निवडणूक
मनसेचे गजानन काळे हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी केलेली विधाने अनेकदा चर्चेत येतात. सध्या सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडिंबताब त्यांनी ट्विट केले आहेत “राज्याची शोभा” होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
शिवसेनेचं हिंदुत्व उघडं पडलं आहे…
राज्यसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने एंट्री केली आहे. एमआयएम पक्षाने राज्यातील महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यावरूनही गजानन काळे यांनी महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ” त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली,ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे”. अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.