नेवासा – अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावरील कांगोणी फाटा शिवारात दोन कराची समोरा समोर टक्कर झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरुवारी राञी १० वाजेच्या सुमारास पुण्याहून ओरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेटा कारला समोरुन येणाऱ्या डस्टर कारने हुलकावणी दिल्यामुळे झालेल्या रस्ता अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मृतांमध्ये एक पुरुष आणि एक स्ञी’ चा समावेश आहे तर या अपघातात शिखा मुरलीधर गडपायले (वय ३६) ही महिला गंभीर जखमी झाली असून तीच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी दवाखाण्यात औषधोपचार सुरु आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, पुणे येथील पिंपरी सौदागर येथून आपल्या क्रेटा कार (क्रमांक एम.एच.१४ जे.एक्स ४०२४) हे वाहन औरंगाबादच्या दिशेने जात असतांना समोरुन येणाऱ्या डस्टर कारने हुलकावणी दिल्यामुळे कांगोणी फाटा शिवारात झालेल्या अपघातात क्रेटा कारमधील परेश मुरलीधर गडपायले (३२) रा.पुणे पिंपरी सौदागर, तसेच सोनिका भिमराव आवसरमोल (३२) रा.औरंगाबाद हे या अपघातात जागीच ठार झाले आहे. तर तिसरी महिला शिखा मुरलीधर गडपायले (३६) या झालेल्या अपघातात क्रेटा कारमध्ये अडकल्या होत्या त्यांना जखमी अवस्थेत कारमधून बाहेर काढून त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी दवाखाण्यात औषधोपचार सुरु असल्याची माहिती मृतक सोनिकाचे बंधू डॉ.सचिन अवसरमोल यांनी दिली असून मृतकांचे शवविच्छेदन नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात करण्याची प्रक्रिया सुरुअसल्याची माहीती वैद्यकिय सुञांनी दिली.
या भीषण अपघातातील मृतकांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी राञीची वेळ असल्याने असपास मदतीला कोणीही नव्हते जखमी मृतकांना झटपट ग्रामीण रुग्णालयात घेवून आलो माञ जखमी मृत झालेले होते अशी माहीती रुग्णवाहिका चालक गणेश लांडे यांनी दैनिक प्रभात’शी दिली.