नवी दिल्ली – दिल्ली-एनसीआरमध्ये हवामान बदलले आहे. मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळाला आहे. उत्तर-पश्चिम भारतावर एकामागून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहेत. त्याचा परिणाम दिल्ली-एनसीआरमध्येही दिसून येत आहे. दिल्ली एनसीआरमध्ये चार वाजता अचानक वातावरणात बदल झाला आणि पाऊस सुरू झाला. मात्र, ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे.
#WATCH | Delhi gets a relief from scorching heat with a heavy downpour & thunderstorm. Visuals from National Media Centre. pic.twitter.com/7ZZuf05GMg
— ANI (@ANI) May 30, 2022
पावसासोबत आलेल्या वादळात सेक्टर-11 मधील ब्लॉक 44, 45, 46 मधील अनेक घरांसमोरील झाडे उन्मळून पडली आहेत. ब्लॉक 44 मधील घराजवळील गॅस पाइपलाइनमधून गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे सेक्टर-62 मधील एलिव्हेटेड रोडवरील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. बिर्ला मंदिर, उद्यान मार्ग, नवी दिल्लीजवळ झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
#WATCH | Delhi: Heavy rain lashes various parts of the national capital.
(Visuals from Lodhi road & RK Ashram Marg) pic.twitter.com/p7jb0tt1J7
— ANI (@ANI) May 30, 2022
प्रादेशिक हवामान अंदाज केंद्रानुसार, पुढील काही तास पश्चिम, उत्तर-पश्चिम, दक्षिण, दक्षिण-पश्चिम दिल्ली आणि लगतच्या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तसेच रोहतक, भिवानी, चरखी, दादरी, मातनहेल, झज्जर, फारुखनगर, कोसली, सोहाना, रेवाडी, पलवल, बावल, नूह, औरंगाबाद, होडल (हरियाणा) सिकंदर राव, हाथरस येथेही हलक्या ते मध्यम तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचा वारा येऊ शकतो.
#WATCH राष्ट्रीय राजधानी दिल्ली में भारी बारिश के बीच में पेड़ गिर गए हैं। वीडियो भाई वीर सिंह मार्ग से है। pic.twitter.com/qDl9M6s6zv
— ANI_HindiNews (@AHindinews) May 30, 2022