राजगुरूनगर – राजगुरूनगर वकील बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी ऍड. नवनाथ गावडे तर उपाध्यक्षपदी ऍड. संतोष दाते, ऍड. ललित नवले यांची निवड झाली आहे. 2022-2023 साठीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, महिला सचिव, लोकल ऑडिटर आणि खजिनदार या पदासाठी मंगळवारी (दि.12) राजगुरूनगर अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायालयात मतदान घेण्यात आले होते.
अध्यक्षपदासाठी ऍड. वैभव कर्वे, ऍड. पांडुरंग राऊत, ऍड. नवनाथ गावडे, ऍड. संजय गोपाळे, उपाध्यक्षपदासाठी ऍड. संतोष दाते, ऍड. बिभिषण पडवळ, ऍड. ललित नवले, ऍड. अमोल घुमटकर, सचिव पदासाठी ऍड. गोपाळ शिंदे, ऍड. अभिजीत जाधव, महिला सचिव पदासाठी ऍड. रेश्मा भोर, ऍड. ऍड. गायत्री रोकडे, ऍड. आरती टाकळकर, ऍड. अर्चना गायकवाड, खजिनदार पदासाठी ऍड. प्रवीण पडवळ, ऍड. मोहिनी केदारी, लोकल ऑडिटर पदासाठी ऍड. संदीप दरेकर, ऍड. अशोक कड हे उमेदवार होते.
या निवडणुकीत एकूण 394 वकिलांनी मतदान केले. मतदानानंतर आठ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. यामध्ये अध्यक्षपदी ऍड. नवनाथ गावडे 149, उपाध्यक्षपदी ऍड. संतोष दाते 203 व ऍड. ललित नवले 183, सचिवपदी ऍड. गोपाळ शिंदे 206, महिला सचिवपदी ऍड. रेश्मा भोर 191, खजिनदारपदी ऍड. प्रवीण पडवळ 232, लोकल ऑडिटरपदावर ऍड. संदीप दरेकर 235 मते मिळवत विजयी झाले. बिनविरोध सदस्यपदी ऍड. अबू बकर पठाण, ऍड. निलेश देशमुख, ऍड. रश्मी वाघुले, ऍड. प्रतिभा होले यांची निवड झाली आहे.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. बी. एम. सांडभोर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. अरुण मुळूक, ऍड. दिलीप करंडे, ऍड. राजेश कुलकर्णी, ऍड. कृष्णा भोगाडे, ऍड. हर्षा पांडे, ऍड. स्वरूपा वाडेकर यांनी काम पहिले. विजयी उमेदवारांचे खेड वकील बार असोशिएशन सदस्यांकडून अभिनंदन करून जल्लोष साजरा करण्यात आला.