वृत्तसंस्था – अमेरिकेतील विस्कॉन्सिनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. ख्रिसमस परेडदरम्यान हा अपघात झाला. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. जखमी मध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परेड सुरू असताना एक वेगाने लाल रंगाची कार घुसली आणि गर्दीला चिरडून पुढे निघून गेली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून चालकाची चौकशी केली जात आहे. पोलीस या घटनेचा वेगवेगळ्या बाजूने तपास करत आहेत.
शहर पोलीस प्रमुख डॅन थॉम्पसन यांनी सांगितले की, संशयिताचे वाहन जप्त करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. काही जखमींना पोलिसांनी तर काहींना त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले आहे.पोलिसांनी घटनास्थळाजवळ न जाण्याचे आवाहन येथील नागरिकांना केले आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये एक एसयूव्ही रस्त्यावरील अडथळे तोडून परेड काढणाऱ्या लोकांना चिरडताना दिसत आहे.
ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. अधिकारी घटनेची चौकशी करत आहेत. अमेरिकेच्या वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता वाउकेशा येथील मिलवॉकी येथे मोठ्या संख्येने लोक वार्षिक ख्रिसमस परेड पाहण्यासाठी आले असताना ही घटना घडली.पोलिसांनी एका संशयिताची ओळख पटल्याचे सांगितले आहे.