दादरा नगर हवेली : राज्यात मुख्यमंत्रीपद मिळविणाऱ्या शिवसेनेने आता आता राष्ट्रीय राजकारणात आगेकूच केली आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर विजयी झाल्या आहेत. त्या महाराष्ट्राबाहेरच्या शिवसेनेच्या पहिल्याच खासदार आहेत.
दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर ही जागा रिक्त झाली होती. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर डेलकर कुटुंबीयांनी भाजपवर आरोप केले होते. नंतर दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता.
दादरा नगर हवेलीत आज भगवा फडकला. लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीमती कलाबेन डेलकर जी यांचा विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे. pic.twitter.com/p5L4djBkpl
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 2, 2021
शिवसेनेकडून पोटनिवडणुकीसाठी कलाबेन डेलकर यांना मैदानात उतरविण्यात आलं होतं. डेलकर यांनी भाजपचे महेश गावित यांना ५० हजार ६७७ मतांनी पराभूत केलं.