आळंदी – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिपक मुंगसे यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) यांचे संयुक्त विद्यमाने ‘पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक’ देण्यात आला. आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व निर्मलाताई पानसरे (अध्यक्षा, जिल्हा परिषद पुणे) यांचे शुभ हस्ते तसेच माजी आमदार रामभाऊ कांडगे, के. एस. ढोमसे (विश्वस्त महाराष्ट्र राज्य TDF), जी. के. थोरात (कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य TDF), वसंतराव ताकवले (अध्यक्ष पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ), मुरलीधर मांजरे (कार्याध्यक्ष पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ) व संघटनेचे इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य दिपक मुंगसे यांची पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांच्या वतीने तसेच विद्यालयातील उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.