पुणे – 195 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेले चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. ग्राहकासाठी घेऊन आले आहेत डिझाईनवाली दिवाळी खास ऑफर्स हा सणासुदीचा काळ अधिक आनंदित करण्यासाठी. ज्यामध्ये सादर होत आहेत आधुनिक कारागिरी आणि पारंपारिक मूल्यांचे परिपूर्ण मिश्रण असलेल्या दागिन्यांची अप्रतिम श्रेणी.
डिझाईनवाली दिवाळीचा सुवर्ण संग्रह लालित्य, गुंतागुंत आणि सर्जनशीलतेभोवती आधारित आहे. अब हर घर में हीरा ही संकल्पना सादर करताना आत्ता पर्यंतच्या दागिन्यांच्या श्रेणी बाहेर पाऊल टाकत चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स यांनी हिऱ्याच्या दागिन्यांचे कलेक्शन सादर केले आहे. ज्यामध्ये परंपरा, शुध्दता आणि सौंदर्य शास्त्र याचा पुरेपुर संगम पहावयास मिळत आहे.
डिझाईनवाली दिवाळी ऑफर अंतर्गत हिऱ्याचा नेकलेस फक्त रू. 9 हजार 999 भरून ग्राहक घरी घेवुन जावू शकतात व उर्वारित रक्कम ईएमआय (हफ्त्या) द्वारे भरू शकता. सोने खरेदीवर चांदी फ्री अशीही ऑफर उपल्ब्ध आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100 टक्के पर्यंत सूट देण्यात आली आहे. तसेच विना घट जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन दागिने अशीही ऑफर सादर केली आहे.
या ऑफर्स चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स यांच्या सर्व शोरूममध्ये 7 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2021 पर्यंत असणार आहेत. तेव्हा ग्राहकांनी चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स यांच्या नजिकच्या शोरूमला भेट द्यावी व अप्रतिम दागिन्यांची खरेदी करून डिझाईनवाली दिवाळी समृध्दतेने व आधिक सौंदर्याने साजरी करावी असे आवाहन या पेढीचे चेअरमन किशोरकुमार शहा यांनी केले आहे.