अकोला – ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर बसने पेट घेतला आहे. या अपघातात दहा प्रवाशी जखमी झाले असून बस चालक गंभीर जखमी आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 खामगाव अकोला रोडवरील शेळद फाट्या जवळ झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिसांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसने पेट घेतल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. घटनास्थळी पोलीस, स्थानिक नागरिकांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.