काबूल – तालिबानच्या क्रूरतेच्या कहाण्या आता सुरू झाल्या आहेत. या गनिमांनी आज घोर प्रांतातीाल एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची तिच्या कुटुंबीयांसमोरच गोळ्या घालून हत्या केली. विशेष म्हणजे ही महिला पोलीस कर्मचारी सहा महिन्यांची गर्भवती होती. ही माहिती सांगूनही तालिबान्यांनी तिला काही दया दाखवली नाही. एका पत्रकाराने ही माहिती जगापुढे आणली आहे.
नुकतीच काबूलमध्ये काही महिलांनी तालिबानी नेत्यांच्या विरोधात निदर्शने करून महिलांना न्याय मिळावा, अशी मागणी केली होती, पण त्याचा तालिबान्यांवर काही एक परिणाम झाला नाही.
अमेरिकेच्या वास्तव्याच्या काळात ज्यांनी अफगाणिस्तानच्या पोलीस दलात काम केले आहे त्यांना लक्ष्य करण्याचा सध्या तालिबानचा प्रयत्न आहे. त्यातून आता महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही काही गय होणार नाही असे वातावरण निर्माण झाल्याने त्याची सगळीकडेच धास्ती आहे.