विशाखापट्टणम: देशातील अनेक ग्रामीण भागात स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही दळणवळणाची साधन नाहीत. दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी पायपीट करून किंवा खाटेवर उचलून आणावे लागते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण दगावतात. असाच प्रकार आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणमधील तोकापाडू गावात घडला आहे.
#WATCH | A pregnant woman was carried on a makeshift palanquin for nearly 12-km from her village to the nearest primary health centre in Balapam panchayat in Visakhapatnam, Andhra Pradesh yesterday pic.twitter.com/DWQRw9e8OP
— ANI (@ANI) August 4, 2021
विशाखापट्टणमधील बालपम पंचायतीच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत कुसंगी चेंद्रम्मा या गर्भवती महिलेला तोकापाडू गावापासून जवळजवळ 12 किलोमीटर अंतरावर पालखीवर ( डोलीत ) नेण्यात आले. या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या दळणवळणाची साधन नसल्यामुळे तब्बल 12 किलोमीटर पायपीट करावी लागली आहे.
दरम्यान, संपूर्ण घटनेचा व्हिडियो आता सोशलवर व्हायरल होत आहे. गरोदर मातेने प्रसूतीसाठी कशा प्रकारे घनदाट जंगल, नदी नाल्याच्या प्रवाहातून वाट काढत तब्बल १२ किलोमीटरचा पायपीट करावा लागला हे या व्हिडियोत दिसून येत आहे.
संबंधित व्हिडियोवर नेटकऱ्यांनीही गावातील न होणाऱ्या विकासावरून तेथील स्थानिक लोकप्रतिनिधीवर प्रश्न उपस्थित केले आहे. अशा घटना वारंवार घडत असतांना देखील प्रशासन या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. असेही काहींनी म्हंटले आहे.