मंगलुरू – कोकण रेल्वे मार्गावर मंगलुरूनजिक कुलशेकर-पडील मार्गावर एका बोगद्या नजिक मोठ्या प्रमाणावर शुक्रवारी दरडी कोसळण्याचा प्रकार घडला आहे. या दरडी मातीच्या स्वरूपातील आहेत. त्या रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात आल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
ही माती दूर करेपर्यंत ही वाहतूक विस्कळीतच राहणार आहे. त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात मजुर व अन्य सामग्री पाठवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे.
त्यामुळे सर्वत्र विशेष दक्षता घेतली जात आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील कोकण भागातही मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत असतात, पण सुदैवाने अजून तरी तशी कोणती मोठी बाधा या भागात आलेली नाही.