मेष : पैशाची तजवीज करुन ठेवावी लागेल. बेकार व्यक्तींना नवी नोकरीची चांगली संधी दृष्टीक्षेपात येईल.
वृषभ : कोणावरही अतिविसंबून राहू नका. आपले काम बिनचूक करा. घरात प्रवासाचे बेत ठरतील. शुभकार्येही ठरतील.
मिथुन : किचकट कामे हातावेगळी कराल. घरात तुमचे विचार इतरांना पटतील. सहमती मिळेल.
कर्क : नोकरीत नवीन आव्हाने पेलावी लागतील. पैशाची स्थिती थोडी नाजूकच राहील. सुवार्ता कळेल.
सिंह : कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात मोठयांच्या प्रकृतीची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा.
कन्या : अतिविश्वास ठेवू नका. आळसाने कामे लांबवलीत तर पुढे दुप्पट कामे करावी लागतील.
तूळ : त्यामुळे दगदग धावपळ होईल. चिडचिड वाढेल. वरिष्ठ कामात सवलतीचे आश्वासन देतील.
वृश्चिक : आवडत्या छंदात वेळ मजेत घालवता येईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. सुखद प्रसंग साजरे होतील.
धनू : पैशाची स्थिती समाधानकारक राहील. बोलल्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.
मकर : स्पर्धकांच्या पुढे जाण्याचा विचार तुमचा असेल. सहकारी कामात मदत करतील. तरूणांनी सतर्क रहावे.
कुंभ : आप्तेष्ट व नातेवाईकांच्या भेटीगाठींचे योग येतील. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी.
मीन : नोकरीत कामातून आर्थिक लाभाचा फायदा मिळेल. जादा अधिकार देतील त्याचा गैरफायदा घेऊ नका.