बिजिंग – चीनमध्ये अचानक झालेल्या खराब वातावरणामुळे 21 खेळाडूंचा मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत.
चीनमध्ये खराब वातावरणामुळे 100 किमी अंतराच्या मॅरोथॉन स्पर्धेतील 21 धावपटूंचा मृत्यू झाला आहे. या मॅरोथॉनमध्ये 172 जणांनी सहभाग नोंदवला होता. परंतु जोरदार वारे, पावसामुळे 21 जणांचा मृत्यू झाला. चीनच्या वायव्य भागात गांसू प्रांतात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
या मॅरेथॉन दरम्यान जोरदार वादळ आले आणि गारांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. या भागातील तापमान मोठ्या प्रमाणात खालावलं. या खराब वातावरणाचा फटका धावपटूंना बसला. तेव्हा या मॅरेथॉनमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला.
बचाव कार्यासाठी 1200 जण कार्यरत होते. मात्र बचाव कार्यात मोठ्या अडचणी आल्या. अखेर 20 जणांचे मृतदेह या भागात सापडले. मृतांचा आकडा 21 वर पोहोचला. या मॅरेथॉनमध्ये 8 जण जखमी झाले असून जखमी धावपटूंवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.