- 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- 673 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवजड शहरामधील करोनाबाधित रुग्णांची संख्येमध्ये आज 734 नवीन रुग्णांची भर पडली. चार दिवसांनंतर आज शहरातील रुग्णसंख्या आठशे पेक्षा कमी आली आहे. तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये एका 29 वर्षीय तरुणांचाही समावेश आहे. आजपर्यंत शहरातील 1 लाख 14 हजार 754 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 728 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 6 रुग्णाची आज नोंद झाली. तसेच दिवसभरात 4 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील एका 29 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. शहरातील पिंपरी, वडमुखवाडी, संत तुकारामनगर व वाकड येथील 4 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2670 रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 1880 व शहराबाहेरील 790 जणांचा समावेश आहे.
आज दिवसभरामध्ये 673 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 5 हजार 929 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2919 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1315 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 1436 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 5509 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 6945 इतकी आहे.
ड प्रभाग होतोय हॉटस्पॉट
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ड प्रभागामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. या प्रभागामध्ये पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरचा परिसर येतो. याठिकाणी आज तब्बल 168 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर त्याखालोखाल ब प्रभागामध्ये 108 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात 4915 जणांना लस देण्यात आली.