चेन्नई – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूतून कित्येकजण सावरत नाहीत तोपर्यंतच आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडालीय. श्रीवास्तव चंद्रशेख असे आत्महत्या केलेल्या अभिनेत्याचे नाव आहे.
श्रीवास्तव चंद्रशेखर हा साऊथ अभिनेता आहे. फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार चंद्रशेखर याने 4 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. त्याच्या वडिलांच्या घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. शुक्रवारी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
श्रीवास्तव याने प्रसिद्ध साऊथ अभिनेता धनुषसोबत काम केलेले आहे. 2019 मध्ये त्याने एनई नोकी पायुम थोट्टा (Enai Noki Paayum)मध्ये धनुषसोबत सहकलाकार म्हणून काम केले होते. तसेच तो वल्लमई थारायो (Vallamai Tharayo) या वेबसीरिजचा भाग होता.
दरम्यान, 22 जानेवारी 2021ला कन्नड अभिनेत्री जयश्री रामय्या हिने आत्महत्या केली होती. तिने गेल्या वर्षी जूनमध्ये सोशल मीडियावर आत्महत्या करणार असल्याची पोस्ट फेसबूकवर अपलोड केली होती. नैराश्येतून बाहेर येत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे तिने म्हटले होते.