वॉशिंग्टन – अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पराभवाची मालिका वाढत चालली आहे. प्रतिष्ठेच्या आणि राजकीय दृष्टीकोनातून महत्वाच्या जॉर्जिया प्रांतातील दोनपैकी सिनेटच्या एका जागेवर डेमोक्रॅटिक पक्ष जिंकला आहे.
तर दुसऱ्या जागेवरही डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे. अमेरिकेतील संयुक्त सभगृहाची म्हणजे “हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ व सिनेटची बैठक काही तासात होणार आहे. या बैठकीत ज्यो बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे गृहित धरले जात आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना भयंकर अवमानित होऊन सत्ता सोडावी लागत आहे.
दक्षिण अमेरिकेतील जॉर्जिया प्रांत हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे. गेल्या 20 वर्षांपासून जॉर्जियामधून रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर निवडून आले आहेत. 3 नोव्हेंबर रोजी जॉर्जिया प्रांतात सिनेट सदस्यांसाठी निवडणूक झाली होती. मात्र निवडून आलेल्या कोणालाही 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते न पडल्यामुळे जॉर्जिया प्रांताच्या घटनेनुसार या दोन जागांसाठी 5 जानेवारी रोजी पुन्हा मतदान झाले. अमेरिकेत सिनेट सभागृहाला भयंकर महत्व आहे.
या सभागृहाच्या मान्यतेशिवाय न्यायधीश आणि मंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या जात नाहीत.सध्या सिनेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षला 50 जागा मिळालेल्या आहेत. तर जॉर्जियातील निवडणूकांपूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाकडे 48 जागा होत्या. त्यमुळे सिनेटमधील् बहुमतसाठी डेमोक्रॅटिक पक्षाने आणि रिपब्लिकन पक्षाने जीवाचे रान केले होते.
काल सायंकाळपर्यंत डोनाल्ड ट्रम्प अणि ज्यो बायडेन जॉर्जिया प्रांतात तळ ठोकून होते. निवडणूकांनंतर आज मतमोजणी सुरू झाली आणि एका जागेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे राफेल वॉरनॉक अपेक्षेप्रमाणे कमी बहुमताने निवडून आले. तरीही त्यांचा विजय अमेरिकन राजकारणात अनन्यसाधार्रण महत्वाचा ठरला जाणार आहे. कारण 100 सदस्यांच्या सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे 49 सदस्य झाले आहेत.
अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस सिनेटच्या पदसिद्ध अध्यक्षा असतील. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांची संख्या 50 वर गेली असल्याचे समजले जाऊ शकते. उरलेल्या एका जागेवरील निकाल लवकरच लागणार आहे. त्या ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जॉन ऑसॉफ अल्पमताने पुढे आहेत. जर ही जागा डेमोक्रॅटिक पक्षाने जिंकली. तर सिनेटमध्ये बऱ्याच वर्षांनंतर डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत होणार आहे.
“हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’ या दुसऱ्या सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाला आगोदरच बहुमत मिलाले आहे. त्यामुळे ज्यो बायडेअ आणि कमला हॅरिस यांना अधिक ताकदीने प्रशासन चालवण्याची संधी मिळणाऱ आहे.
अमेरिकेच्या संयुक्त सभागृहाची बैठक चालू झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ज्यो बायडेन यांना 300 पेक्षा जास्त इलेक्टोरल कॉलेज मते पडलेली आहेत. अमेरिकेच्या निवडणूक पद्धतीनुसार संयुक्त सभागृह या मतांना आणि निवडलेल्या अध्यक्षांना मंजूरी देते.
मात्र ट्रम्प गटाच्या एक डझन सिनेटरनी बायडेन यांच्या निवडीला संयुक्त बैठकीत आव्हान देण्याचा निर्णय घेतल आहे.परंतू ट्रम्प गटाच्या सदस्यांची डझनभर संख्या लक्षात घेता, संयुक्त सभागृहात बहुमत स्पष्टपणे बायडेन यांच्या बाजूने जाणार आहे. मात्र ट्रम्प गटाच्या सद्स्यांच्या हरकतीवर बराच काळ चर्चा होऊन अंतिम निर्णयाला गुरुवार उजाडू शकतो.