बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलने काही वर्षांतच प्रेक्षकांमध्ये स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनय अभिनयाने त्याने चांगली फॅलो फॉलोइंग केली असून तो सतत चाहत्यांना प्रभावित करत असतो. विक्की कौशल हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात असतो. तो कधी त्याच्या बालपणीचे फोटो शेअर करून चाहत्यांना चकित करतो, तर कधी स्वतःचे मस्त लूकमधील फोटो चाहत्यांशी शेअर करतो. अलीकडेच विक्की कौशलने चाहत्यांना त्यांच्या खास शेजारणीची ओळख करून दिली आहे.
विक्कीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विक्की कौशलने आपल्या शेजारच्या डॉगी बेलाबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात विक्की बेलाला उचलून घेत तिच्यावर प्रेम करताना दिसत आहे. मजेची गोष्ट अशी आहे की बेलादेखील विक्कीबरोबर खूपच आरामदायक दिसत आहे. विक्कीने फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले- “पडोसन. ञ्च बेला.’ दरम्यान, या फोटोला 1 दिवसातच 6 लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत.
वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास “उरी’ फेम ऍक्टर विक्की कौशल नुकताच “भूत पार्ट वन द हॉन्टेड शिप’ चित्रपटात झळकला होता. मात्र, या चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. आगामी प्रोजेक्ट्सबाबत सांगायचे झाल्यास तो “सरदार उधम सिंह’मध्ये काम करत आहे. यात त्याच्यासोबत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे.