आपल्या आयुष्यात असे काही टर्निंग पॉईंट येतात की त्यामुळे आयुष्याची दिशाच बदलून जाते. अशाच एका टर्निंग पॉईंटची आठवण कृती खरबंदाने शेअर केली आहे.
2017 साली “शादी में जरूर आना’ या सिनेमाने आपल्या आयुष्यात असाच बदल घडवला होता, असे कृतीने म्हटले आहे. तीन वर्षांपूर्वी हा सिनेमा 10 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला होता.
त्यामुळे कृतीला या सिनेमाची आठवण झाली. या निमित्ताने कृतीने इन्स्टाग्रामवर या सिनेमाशी संबंधित काही आठवणी शेअर केल्या आहेत. तिने या सिनेमातील काही सीन देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ही एका अरेंज्ड मॅरेनशी संबंधित कथा आहे. लग्न झाल्यावर पहिल्या रात्री अशा घटना घडतात की कथा लव्ह् स्टोरी न बनता एक सूड कथा बनून जाते. या कथेतील ट्विस्टमुळेच हा सिनेमा आपल्यासाठी एकदम स्पेशल बनला होता, असे कृती म्हणाली.
या सिनेमाव्यतिरिक्त “तईश’ आणि काही वेबसिरीजमध्येही कृतीने काम केले आहे. सध्या ती मलेरियावरील उपचार घेते आहे.
या वर्षी करोनाची साथ् आणि अन्य इतर कारणांमुळे तिला घरीच बसून रहावे लागले होते. आता लवकरात लवकर तिला आपल्या उर्वरित प्रोजेक्टच्या कामाला सुरूवात करायची आहे.