भोर – भोर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या रोजच्या रोज वाढतच असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. 27) 19, शुक्रवारी (दि. 28) 40 , शनिवारी (दि. 29) 37 असे तीन दिवसांत 96 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
भोर, नसरापूर व पुणे येथे 171 बाधितांवर उपचार सुरू असल्याचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे व डॉ.सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
तालुक्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 609 वर पोहचली असून 471 जणांनी करोनावर मात केली आहे. तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे.