नवी दिल्ली- देशात आता दूरसंचार क्षेत्रात 5 जी तंत्रज्ञान येण्याची तयारी सुरू करण्यात आली असून दूरसंचार मंत्री रविशंकरप्रसाद यांनी म्हटले आहे की ही सेवा देऊ इच्छिणाऱ्या सर्व कंपन्यांनी आम्ही ट्रायलसाठी 5 जी स्पेक्ट्रम देण्याचे योजले आहे. हा निर्णय अधिकृतपणे घेण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले.
चीन मधील हुआवेई ही कंपनी भारतात 5 जी सेवा देणार आहे. त्यांनाही ट्रायल स्वरूपात हे स्पेक्ट्रम देण्यात येतील असे प्रसाद यांनी सांगितले. 5 जी सेवेमुळे भारतातील दुरसंचार आणि अन्य संबंधीत सेवांचा वेग कमालीचा वाढणार आहे. त्यातुन अनेक कामे सुलभ होणार आहेत असे प्रसाद म्हणाले.
5 जी परवाने लिलावाने विकले जाणार असले तरी त्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वच कंपन्यांना प्रायोगीक तत्वावर हे तात्पुरते परवाने दिल्यानंतर त्यांच्या कडूनही योग्य ते इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जाईल आणि त्यामुळे या तंत्राची सेवा त्वरीत ग्राहकांनाही उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.