विमान अपघातानंतर पंतप्रधान मोरारजी परतले
नवी दिल्ली, दि. 5 – पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे आज दुपारी आगमन झाले. जोहराटहून हवाई दलाच्या विमानाने ते येथे परतले. हवाई दलाच्या विमान अपघातात ते काल सुदैवाने बचावले. जोरहाट येथील हवाई दलाच्या इस्पितळात आज देसाई यांची तपासणी करण्यात आली.
त्यांची प्रकृती उत्तम आहे. काल सायंकाळी देसाईंच्या विमानास अपघात झाला. जोरहाटपासून 14 किमी व जोरहाट विमानतळापासून 8 किमी अंतरावर भात शेतात ही दुर्दैवी घटना घडली.
कोयना भागात भूकंपाचे धक्के
हैदराबाद – येथील भूकंप निदर्शक यंत्रावर कोयना भागात भूकंपाचे 3 धक्के बसल्याची नोंद झाली आहे. मुंबईतील कुलाबा भूकंप निदर्शक यंत्रावरही कोयना भागात 3 भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे.
राज्याच्या काही भागात अद्यापही वेठबिगारी
नागपूर – राज्यातील आदिवासी भागात अद्यापि “पालेमोल’ या स्वरुपात वेठबिगारीची पद्धत लक्षणीय स्वरुपात मोठी आहे. लगनगडी, घरगडी, सालदार व लमझाना या स्वरुपातही अस्तित्वात आहे.