नगर – पैठण- पंढरपूर पालखी मार्ग व खरवंडी कासार-लोहा या राष्ट्रीय महामार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील पाच गावातील संपादित केलेल्या जमिनीचा 35 कोटी रुपये मोबदला केंद्र सरकारने मंजूर केल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
पैठण- पंढरपूर या पालखी मार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील पाच गावातील संपादित केलेल्या भूसंपादनाचे 20 कोटी 72 लाख आणि खरवंडी -कासार-लोहा या राष्ट्रीय महामार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील चार गावांच्या संपादित जमिनीसाठी 14 कोटी 18 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या भूसंपादनाच्या मोबदल्या संदर्भात सातत्याने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर आज केंद्र सरकारने या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मंजूर केला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच हा मोबदला मंजूर केला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार असल्याचे खा. डॉ. विखे म्हणाले.