वॉशिंग्टन – अमेरिका आणि कॅनडामध्ये तुफानी हिमवादळामुळे किमान 12 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासपासून क्युबेक पर्यंत तब्बल 3,200 किलोमीटरच्या पट्ट्याला या हिमवादळाचा फटका बसला आहे. 20 कोटी लोकांना या हिमवादळामुळे कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो आहे. बर्फवृष्टीमुळे 3 हजारांपेक्षा अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत.
सिशीगन आणि पेनसिल्वेनियामध्ये आगामी काळात आणखीन बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. न्यू इंग्लंड, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी याठिकाणी समुद्रकिनाऱ्यांवर पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नीचांकी तापसानाची नोंद आणखीन किमान 4 दिवस तरी नोंदवली जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.