भवानीनगर, (वार्ताहर)-श्री छत्रपती हायस्कूल सणसर या विद्यालयाचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे.श्री छत्रपती सणसर विद्यालयातील एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस 34 विद्यार्थी बसले होते. -पैकीअ श्रेणीत 3, ब श्रेणीत 7, क श्रेणीत-14 तसेच इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस 41 पैकी अ श्रेणीत 4, ब श्रेणीत 9, क श्रेणीत 28 विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे व सर्व सदस्य तसेच श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरचे संचालक रणजित निंबाळकर, डॉ. दिपक निंबाळकर, सरपंच पार्थ निंबाळकर, सर्व सदस्य, मुख्याध्यापक सुनिल सर्जे, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दीक आभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे कला शिक्षक घाडगे यांचेही आभिनंदन करण्यात आले.