नागपूर – सध्या देशभरात ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार वाढले असून वेगवेगळ्या युक्त्या वापरून हॅकर्स हजारोंची लूट करत आहेत. दुसरीकडे ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून लुबाडले जात आहे. अशीच एक घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. ऑनलाइन गेमिंग ऍपच्या माध्यमातून तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक उघडकीस आली आहे. हे रॅकेट देशभर पसरले असल्याची माहिती मिळत आहे.
आरोपीने ऑनलाइन गेमिंग ऍपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमविण्याचे आमिष दाखवले होते. गोंदियाच्या अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन याने ही फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
या ऍपच्या लिंकमध्ये सेटिंग मॅन्युपुलेट केलेली होती. ‘डॉक्टर्ड’ ऍप अशा पद्धतीने तयार केले होते की त्यात खेळणारा हरत जातो. या प्रकरणातील आरोपी फरार असून तो दुबईला पळून गेल्याची माहिती आहे.
आरोपीच्या घरातून 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. या ऍपची लिंक केवळ राज्यात नव्हे तर भारताबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आणखी लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.