हिराबाई कुंडलिक घाटोळे यांचे निधन
महाराष्ट्र राज्य ड्रायव्हींग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजू घाटोळे यांच्या मातोश्री कै. हिराबाई कुंडलिक घाटोळे यांचे दिनांक 30 ऑगस्ट रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती कुंडलिक घाटोळे, मुलगा दिलीप घाटोळे, राजु घाटोळे, मुलगी सविता बोराटे, सुमन सातव असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी रविवार दि.8 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता वैकुंठ स्मशान भुमी येथे होणार आहे.