भिगवण-येथील बाजारपेठेतही करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेक व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहेत. नेहमी गजबजलेली भिगवणची बाजारपेठ आता मात्र शांत झाल्याचे दिसत आहे. सावधगीरीचा भाग म्हणून अनेकांनी दुकाने बंद ठेवण्याचे धोरण अवलंबले आहे. फोन व सोशल मिडीयाच्या माध्यमातून साधक-बाधक माहिती पसरविल्याची चर्चा असून नागरीकांमध्ये काहीसे घबराटीचे वातावरण आहे.
भिगवण परिसरात अद्याप कोणत्याही रुग्णास करोनाची लक्षणे नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नये, सावधगिरी बाळगावी. तसेच आरोग्य विभागाची यंत्रणा सजग असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत सरतापे यांनी दिली.