‘भाजपाने हरियाणात आघाडी केलेल्या पक्षाला शून्य जागा’; रोहित पवारांनी ‘काकांना’ दिला, ‘सतर्कतेचा इशारा’

Rohit Pawar । हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल आले लागले. निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून त्यांनी सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा विक्रम केला आहे, तर काँग्रेसची सर्वाधिक निराशा झाली आहे. निवडणुकीपूर्वी आणि मतदानानंतर अनेक तज्ज्ञ, एक्झिट पोल आणि टीव्ही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा करत होते, पण निकाल उलट लागला.
अशात या निकालावरून सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी या निकालावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
रोहित पवार म्हणाले,’हरियाणा निवडणुकीत २ ० १ ९ मध्ये भाजपाला केवळ ४ ० जागा मिळाल्या होत्या. त्यावेलीच्या निवडणुकांमध्ये भाजप पक्षाला बहुमतासाठी फक्त ६ जागा कमी पडत होत्या यातही भाजपने जननायक जनता पक्षासोबत युती करत १ ० आमदार निवडून आणले. भाजप पक्षाचे राजकीय समीकरण बघता भाजप पक्ष हा भाजप ज्या पक्षासोबत आघाडी आणि युती करतो त्याला कालांतराने संपवतो असे आरोपही त्यांच्यावर होत असतात. नुकत्याच लागलेल्या हरियाणा निकालात असेचा काहीसे चित्र होते. त्यामुळे यातून महाराष्ट्रातील निकालावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
ते पुढे म्हणाले,’दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्षाला यावेळच्या निवडणुकीत शून्य जागा मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अमित शाहांनी महाराष्ट्र दौऱ्यात २०२९ ला भाजपाचा मुख्यमंत्री स्वबळावर येईल, असे जाहीर केले आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातही भाजपाचे मित्रपक्ष संपवले जातील, हे सिद्ध होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हरियाणाच्या निकालातून खूप काही शिकले पाहीजे.’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.





