Maharashtra Assembly Election 2024 ।राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहे. अशात दोन्ही युतीने जागावाटपावरून बैठका घायला सुरुवात केली आहे. सर्वच पक्षाने निवडणुकांसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अशात भाजप पक्षकडून मोठी अपडेट समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,येत्या आठवड्याभरात भाजप पक्षाकडून पहिली यादी घोषित होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मागील दोन आठवड्यात निवडणुकीतील उमेदवारांच्या नावाची फायनल यादी तयार करण्यात आली आहे. तर आता लवकरच निवडणुका जाहीर होताच भाजपकडून पहिली यादी तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, हरियाणा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले या विजयानंतर भाजप पक्षाची पॉवर वाढलेली दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आठवडाभरात भाजपची पहिली यादी घोषित होऊ शकते.
हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल आले आहे. निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून त्यांनी सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा विक्रम केला आहे. या विजयानंतर भाजपने राज्यात येत्या विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली असून उमेदवारांच्या नावाच्या यादीची यांनी चाचपणी या बैठकीत करण्यात घेतली आहे. भाजपकडून पहिली यादी आठवडाभरात जाहीर होईल, अशी माहीती मिळत आहे. पुढील काळातही भाजपकडून बैठकांचं सत्र सुरूच असेल. मुंबई, कोकण , उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या विभागासाठी येत्या दोन दिवसांत बैठका पार पडणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्याने उमेदवारी निश्चित केली जाणार आहे, सी माहिती सूत्रांनी दिली.
तत्त्पूर्वी, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीती जागावाटपाची चर्चा सुरु झाली होती. महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांपैकी भाजप 140 ते 150 जागांवर आपले उमेदवार उभे करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 80 तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी 55 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीतील छोट्या मित्रपक्षांसाठी तीन जागांचा कोटा ठेवण्यात आला आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.