Yuzvendra Chahal T Shirt : युजवेंद्र चहलने घटस्फोट घेतल्यानंतर धनश्रीला मारला टोमणा? VIDEO होतोय व्हायरल

Yuzvendra chahal tshirt viral after divorce with Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यातील घटस्फोटावर कोर्टाने गुरुवारी शिक्कामोर्तब केला. तत्पूर्वी युजवेंद्र आणि धनश्री मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टात पोहोचले होते, तेव्हा युजवेंद्र चहलने घातलेल्या काळे टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचे नक्की कारण काय होते? जाणून घेऊया.
या घटस्फोटाच्या बदल्यात धनश्री वर्माला चहलकडून ४.७५ कोटी रुपये पोटगी मिळाली आहे, त्यापैकी २.३७ कोटी रुपये चहलने धनश्रीला दिले आहेत. चहल जेव्हा कोर्टवर पोहोचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता आणि त्याने काळी हुडी घातली होती, पण जेव्हा तो कोर्टाबाहेर आला तेव्हा त्याने त्याची हुडी काढली. हुडी काढल्यानंतर, त्याच्या टी-शर्टवर लिहिलेले कॅप्शन वाचून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
युजवेंद्र चहलच्या टी-२० शर्टने वेधले सर्वांचे लक्ष्य –
Yuzvendra Chahal wearing a t-shirt- 'Be your own Sugar Daddy ' while Visiting court.
Judge sahab bhi soch rahe honge kya banda hai ye 😂#dhanashreeverma #YuzvendraChahal pic.twitter.com/NpA59s9ETs
— बलिया वाले 2.0 (@balliawalebaba) March 20, 2025
या घटस्फोटानंतर चहलने निश्चितच आपला चेहरा मास्कने झाकला होता, पण टी-शर्टचे कॅप्शन बरेच काही सांगत होते. त्यावर लिहिले होते, ‘बी युवर ओन शुगर डॅडी’. इंग्रजीत लिहिलेल्या या कॅप्शनची आता खूप चर्चा होत आहे. खरं तर, चहलच्या टी-शर्टवर लिहिलेल्या ‘शुगर डॅडी’ या इंग्रजी कॅप्शनचा अर्थ असा आहे की, जो पैसे किंवा भेटवस्तूंच्या बदल्यात एखाद्या तरुणाशी किंवा महिलेशी संबंध ठेवतो. चहल असा कॅप्शन असलेला टी-शर्ट घालून कोर्टवर पोहोचला हा योगायोग असू शकतो, पण काहीही असो, त्याच्या टी-शर्टच्या कॅप्शनची सर्वत्र चर्चा होत आहे.
धनश्रीचं नवीन गाणं सोशल मीडियावर व्हायरल –
#DhanashreeVerma unveils new song on toxic relationship amid divorce with #YuzvendraChahal pic.twitter.com/KZQL4Kmgf2
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) March 20, 2025
दरम्यान, चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या एका नवीन गाण्याचे पोस्टर शेअर केले. हे गाणे पण सध्या व्हायरल होत आहे. गाणे व्हायरल होण्याचे कारण म्हणजे त्याचे बोल आबहेत. गाण्याचे बोल आहेत, ‘देखा जी देखा मैंने गैरों के बिस्तर पर अपनों को सोते देखा।” चाहते या गाण्याचा संबंध चहलशी जोडत आहेत. कारण काही दिवसांपूर्वी युजवेंद्र चहल आरजे माहवशसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामना पाहण्यासाठी गेला होता, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.





